Friday, November 28, 2008

मुंबई वरील हल्ला..हे युद्धच




हे तर युद्धच...
(पान 1 वरून)
येते. हेमंत करकरे तर गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडलेले होते. पण त्यांच्या बलिदानाने त्यांच्याविषयीचा तो वाद आता इतिहासजमा झाला आहे असे म्हणावे लागेल. या तिन्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बलिदानाने एकीकडे महाराष्ट्र पोलिसांची शान जरुर वाढली पण त्याचबरोबर त्यांच्या मृत्युने महाराष्ट्र पोलिसात फार मोठी पोकळीही निर्माण झाली आहे.
या हल्ल्याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून दहशतवादाचा खरा व अतिशय क्रूर चेहरा जगासमोर आला आहे.त्यावर जात, धर्म, देश यांचा शिक्का मारला जातो, पण त्यापैकी कशाचेही दहशतवादाला सोयरसुतक नसते, दहशतवाद हाच त्यांचा धर्म असतो, तीच जात असते व तोच देश असतो. अन्यथा शिकलेसवरले, गोरेगोमटे तरुण या अत्यंत घृणास्पद व्यवहारात सहभागीच झाले नसते.
या हल्ल्यासाठी केंद्र सरकारचे दहशतवादाच्या विरोधातील नेभळट धोरणच मुख्यत: कारणीभूत असले तरी त्याची चर्चा करण्याची आजची वेळ नाही. पण एक बाब आजच आणि आत्ताच नमूद करणेही तेवढेच आवश्यक आहे. ती म्हणजे केंद्र सरकारने आपल्या राजकीय स्वार्थासाठी आरोपित भगव्या दहशतवादाचा शोध घेण्याचा जो बालीश प्रयत्न चालविला होता, त्याचे अपरिहार्य पर्यवसान म्हणजे हा हल्ला होय. आता तरी आपण दहशतवादाचे खरे स्वरुप ओळखले पाहिजे. त्याला धर्माच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न सोडला पाहिजे. आता फक्त दहशतवाद हा दहशतवादच आहे असे समजून त्याला नेस्तनाबूत करण्याची प्रतिज्ञा घेणे आणि व जनता व सरकार यांनी सुरक्षा यंत्रणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच आजच्या क्षणाची गरज आहे.त्या भावनेतून या संघर्षात प्राणांची आहुती देणारे पोलिस अधिकारी व निरपराध नागरिक यांना श्रध्दांजली अर्पण करु या.

1 comment:

ajit birajdar said...

hoy , he yudhach. best blog...ajeet