Wednesday, November 19, 2008

कॉंग्रेसजन पापाचे घडे भरत आहेत!

कॉंग्रेसजन पापाचे घडे भरत आहेत!
हिंदुधर्मात दशापराध सांगितले आहेत. मनुष्याने स्वतःची ऐहिक व आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी सांगितलेल्या दहा पापांपासून कसे दूर रहाता येईल, याबाबत सदैव सतर्क रहात त्याने जीवनात मार्गक्रमण करायला हवे. या पृथ्वीतलावर आपण जोवर सजीव स्वरूपात जीवन व्यथित करत आहोत, तोवर सत्‌कर्म करत रहावे. योग्य क्रियमान करत पुण्याचा संचय निर्माण करणे आणि जीवनाच्या अंतिमक्षणाला ही पुण्याची शिदोरी सोबत घेऊन मरणोत्तर मार्गक्रमण करत रहाणे, असा विचार हिंदू धर्माने दिला आहे.
दुर्दैवाने पुरोगामित्वाच्या आहारी गेलेला हिंदू या विचारांशी सलगी ठेवत नाही, त्यामुळे त्याला पाप-पुण्याचा हिशेब यासंबंधी भय उरले नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक आणि कॉंग्रेसजन! एखाद्या दगडालाही पाझर फुटेल, इतका भयंकर अत्याचार दहशतवाद विरोधी पथकाने साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि त्यांचे शिष्य भीमभाई या दोघांवर केला आहे.
साध्वी प्रज्ञा सिंग यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, ""10 ऑक्टोबर रोजी एटीएस्‌चे अधिकारी सावंत यांनी मला सूरतला बोलावून घेतले, त्यावेळी मला व शिष्य भीमभाई यांंना ट्रेनने मुंबईत आणले. 12 ते 17 ऑक्टोबर दरम्यान अधिकारी खानविलकर, मिशी असलेले वरिष्ठ अधिकारी व इतरांनी मला रात्रंदिवस प्रचंड मारहाण केली. शिष्य भीमभाईला मला मारण्यास भाग पाडले. तो हळुवार मारहाण करतो; म्हणून खानविलकर यांनी पट्ट्याने दोन्ही हातांवर, पायांवर आणि तळव्यांवर मला व भीमभाई यांना अमानुष मारहाण केली. हातपाय सुजल्याने प्रचंड वेदना होत होत्या; पण वकील, नातलग कुणाशीही माझा संपर्क होऊ दिला नाही. मालेगाव बॉंबस्फोट प्रकरणात सहभाग असल्याची कबुली देण्यासाठी हा छळ होत होता.''
हिंदुधर्मात गुरु-शिष्य नाते हे सर्वाधिक पवित्र नाते मानले जाते. शिष्याकरवी गुरूंना मारहाण करण्यास भाग पाडणे, हे टोकाचे क्रौर्य आहे. या पापाचे धनी एटीएस्‌वाले आणि "मतांच्या राजकारणासाठी काहीही करा, हातपाय तोडा, डोकी फोडा; पण साध्वी आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या तोंडून "आम्ही दहशतवादी आहोत', असे वदवून घ्या', असा अट्टाहास धरत एटीएस्‌वाल्यांचा पिच्छा पुरवणारे राष्ट्रवादी कॉंंग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार व त्यासाठी झटणारे गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील ही सर्व मंडळी या पापाचे प्रमुख भागीदारी आहेत. हिंदू संत व धर्मगुरु यांची प्रतिमा खराब करून हिंदूंच्या मनामध्ये त्यांचे संत व धर्मगुरु यांच्याविषयी द्वेष निर्माण करायचा आणि मुसलमानांना खुश करून त्यांची मते मिळवायची, अशी राजकीय खेळी यामागे आहे; पण हे कॉंग्रेसजन करायला गेले एक आणि घडतयं एक. निवडणुकांच्या मौसमात अवघ्या देशातून साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या प्रती सहानुभूतीची लाट निर्माण होत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये लोकशाहीप्रती उदासीन राहून कालपर्यंत मतदानाचा दिवस म्हणजे सुटीचा दिवस असे मानणारे हिंदू आतापासूनच मतदानाची प्रतिक्षा करू लागले आहेत. याची झलक कालच जम्मू - काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्याचे मतदान पार पडले, तेव्हा पाहायला मिळाली आहे.
बाबा अमरनाथ मंदिर न्यासाला जागा मिळावी म्हणून काश्मीरखोऱ्यात हिंदूंचे जे उत्स्फूर्त संघटीत आंदोलन 50 दिवस झाले, त्यामुळे तेथील हिंदूंची मानसिकता पूर्णपणे पालटली आहे. मुसलमानी दहशतवादाला घाबरून "काश्मीरमध्ये पुनर्वसनाचा विचार करणे म्हणजे दिवास्वप्न', असे मानणाऱ्या काश्मिरी हिंदूंच्या मनात थेट राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली आहे. सत्तेची आस त्यांना खुणावू लागली आहे. त्यामुळे येथे पहिल्या टप्प्यात 55 टक्के मतदान झाले. आता तेथे काश्मिरी हिंदू निवडणूक लढवत आहेत.
आपल्यावर होत असलेल्या अत्याचारांपासून मुक्त होण्यासाठी आता सत्तासंपादन केल्याशिवाय पर्याय नाही, हे हिंदूंना उमगले आहे. कालपर्यंत हिंदूंमध्ये सत्तेबाबत अनास्था निर्माण करून त्यांना मतदानापासून दूर ठेवायचे आणि 13 टक्के मुसलमान, अडीच टक्के खिस्ती व इतर तीन टक्के यांच्या एकगठ्ठा मतांच्या जोरावर 82 टक्के हिंदूंवर राज्य करणारे कॉंगे्रेसजन व त्यांंच्या मित्रपक्षांना या देशातील हिंदूबहुल आता धडा शिकवणार, ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
साध्वी प्रज्ञा सिंग व स्वामी दयानंद यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित या हिंदूंचे संत आणि सेनाधिकारी यांना बदनाम करून हिंदूंना येणाऱ्या निवडणुकांमध्ये गाडून टाकण्यासाठी कॉंगेे्रसने जो "मालेगाव बॉंबस्फोटा'चा खड्डा खोदला, त्या खड्ड्यात ते स्वतः गाडले जाणार ! ऐहीक प्रगतीच्या मागे धावतांना दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी हे दोन्ही कॉंग्रेस नेत्यांच्या इशाऱ्यावरून जी कृत्ये करत आहेत, त्यातून ते पापाचे घडे भरत आहेत.
राजकारणात नेहमी कमी अधिक होत रहाते. राजकीय वरदहस्ताखाली एटीएसवाल्यांना कदाचित संरक्षण मिळू शकते; पण देवाच्या दरबारात त्यांंना या पापाचा हिशेब द्यावा लागेल, याचे भान त्यांनी ठेवावे !
डॉ. अक्षरा पाटील

No comments: